जिथे सागरा धरणी मिळते,Jithe Sagara Dharani Milate

जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहते

डोंगर दरिचे सोडून घर ते
पल्लव पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे
प्रीत नदीशी एकरुपते

वेचित वाळूत शंख शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येउनी
धुंदीत यौवन जिथे डोलते

बघुनी नभीची चंद्रकोर ती
सागर हृदयी उर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी
प्रीतजीवना ओढ लागते

No comments:

Post a Comment