Showing posts with label जानकी (१९६९). Show all posts
Showing posts with label जानकी (१९६९). Show all posts

विसरू नको श्रीरामा,Visaru Nako Shri Rama

विसरू नको, श्रीरामा, मला
मी तुझ्या पाउली जीव वाहिला,
प्रिया !

किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले, घेऊनी हिंडले,
सतीचा वसा !

तू सांब भोळा, उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते, आपुले, वेगळे
जुळे श्यामला !

कसे दान आले रित्या ओंजळीत
तुझ्यावीण झाले अभागी, अनाथ
तुझ्या अंकुरासाठी, सोसते, झेलते
उन्हाच्या झळा !

मी सोडुन सारी लाज,Mi Sodun Sari Laj

मी सोडुन सारी लाज,
अशी बेभान नाचले आज, कि घुंगरू तुटले रे !

बहरली वीज देहात
उतरले प्राण पायात
वाऱ्याचा धरुनी हात,
अशी बेभान नाचले आज, कि घुंगरू तुटले रे !

मन वेडे जेथे जाय
ते जवळी होते, हाय
अर्ध्यात लचकला पाय,
तरी बेभान नाचले आज, कि घुंगरू तुटले रे !

झुलतो बाई रास-झुला,Jhulato Bai Ras Jhula

झुलतो बाई, रास-झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा

वाऱ्याची वेणू, फांद्यांच्या टिपऱ्या
गुंफतात गोफ, चांदण्यात छाया
आभाळाच्या भाळावरी, चंदेरी टिळा

प्राणहीन भासे, रासाचा रंग
रंगहीन सारे, नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे, हरि सावळा

गुंतलास कोठे नंद-नंदना तू
राधेच्या रमणा, केव्हा येशील तू
घट झरे, रात सरे, ऋतू चालला