Showing posts with label गणगौळण (१९६९). Show all posts
Showing posts with label गणगौळण (१९६९). Show all posts

गणगौळण झाली सुरू,Gan Gaulan Jhali Suru

रिद्धीसिद्धीचा भाग्यविधाता, देव गजानन बुद्धीदाता
तो सुखकर्ता, तो दु:खहर्ता, चरण तयाचे धरू
गणगौळण झाली सुरू

कागद करुनि या धरतीचा, कलम-कुंचला मोरपिसांचा
हार गुंफिता कवन फुलांचा, अमृत लागे झरू
गणगौळण झाली सुरू

सूर-तालांची जाता वर्दी, देवदिकांची झाली गर्दी
जमले श्रोते जमले दर्दी, त्यांची सेवा करू
गणगौळण झाली सुरू