Showing posts with label उषा मंगेशकर. Show all posts
Showing posts with label उषा मंगेशकर. Show all posts

मी कशाला आरशात पाहु ग MI KASHALA AARASHAT PAHU G




मी कशाला आरशात पाहु ग
मी कशाला बंधनात राहु ग
मीच माझा रुपाची राणी ग

वारा भारी खट्याळ
असा वाहे झुळझुळ
उडवी बटा कशा
ग बाई ,आवरू तरी कशा
वैरी ,झोंबे असा अंगा
कशी साहू ग
मी कशाला आरशात पाहु ग

झाडवेली जोडीने
बघतात निरखून
माझ्याकडे कशा
ग बाई ,जीव हो वेडापिसा
वाटे ,जावे तसे निघुन
कशी जाऊ ग
मी कशाला आरशात पाहु ग

प्राजकताच्या छायेत
फुलांची ही बरसात
भिजले तयात मी
ग सुख हे ,अथांग कि
 गाने ,उसळे देहात
कशी गऊ ग

मी कशाला आरशात पाहु ग
मी कशाला बंधनात राहु ग
मीच माझा रुपाची राणी ग






Lyrics -हृषीराज  RISHIRAJ
Music -मुरलीधर गोडे MURALIDHAR GODE
Singer - उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु  

गोड गोजरी लाज लाजरी,God Gojiri Laj Lajari

गोड गोजरी, लाज लाजरी ताई तू होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला ग दारी

करकमलांच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे
हळदीहुनही पिवळा बाई रंग तुला तो साजे
नथणी-बुगडी लाजे,
रूप पाहुनी तुझे, बांधु ताई मणि-मंगळ-सरी

भरजरीचा शालू नेसुनी झाली, ताई आमुची गौरी
लग्न-मंडपी तिच्या समोरी, उभी तिकडची स्वारी
अंतरपाट धरी,
शिवा पार्वती वरी, लाडकी ही जाई, ताई दुरी