Showing posts with label आंधळा मारतो डोळा (१९७३). Show all posts
Showing posts with label आंधळा मारतो डोळा (१९७३). Show all posts

माझ्या भावाला माझी माया,Majhya Bhavala Majhi Maya

जीव भोळा खुळा, कसा लावू लळा
देवा उदंड त्याला औक्ष मिळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे

आई बाबांची सावली सरं
छाया भावाची डोईवर उरं
आई अंबाबाई तुला मागू काही
बंधुरायाची इडापिडा दूर टळू दे

भाऊ होईल गुणानं मोठ्ठा
तिथं सुखाला कसला तोटा
त्याची किरत अशी जाता दाही दिशी
माय लक्षुमी त्याच्या मागं पळू दे

बायको मिळंल भावाला देखणी
चपट्या नाकाची, डोळ्यानं चकणी
वैनीबाई जरा, त्याला शानं करा
वरशा वरशाला त्याचा पाळणा हलू दे

चल रं शिरपा,Chal Ra Shirpa

चल रं शिरपा, द्येवाची किरपा, झालीया औंदा छान
गाऊ मोटं वरचं गानं

चल माज्या राजा, चल रं सर्जा बिगी बिगी
बिगी बिगी डौलानं.. डौलानं..
गाऊ मोटं वरचं गानं

मोट चालली मळ्यात माज्या, चाक वाजतंय कुई कुई
पाटाचं पानी, झुळझुळवानी फुलवीत जातंय जाईजुई
धरती माता, येईल आता, नेसून हिरवं लेनं रं लेनं
गाऊ मोटं वरचं गानं

गाजर मुळा नी केळी राताळी माघातला हरभरा
पडवळ काकडी वांगी वालपापडी मक्याचा डुलतोय तुरा
कोथमिर घेवडा सुवासी केवडा उसाचं लावलंय बेनं रं बेनं
गाऊ मोटं वरचं गानं

उसाचं पीक आलंय जोसात औंदा
अरं देईल बरकत मिरची नी कांदा
वाटाना भेंडी तेजीचा सौदा
खुषीत गातुया शेतकरी दादा

गव्हाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करतीया पिरमानं पिरमानं
गाऊ मोटं वरचं गानं