चल रं शिरपा, द्येवाची किरपा, झालीया औंदा छान
गाऊ मोटं वरचं गानं
चल माज्या राजा, चल रं सर्जा बिगी बिगी
बिगी बिगी डौलानं.. डौलानं..
गाऊ मोटं वरचं गानं
मोट चालली मळ्यात माज्या, चाक वाजतंय कुई कुई
पाटाचं पानी, झुळझुळवानी फुलवीत जातंय जाईजुई
धरती माता, येईल आता, नेसून हिरवं लेनं रं लेनं
गाऊ मोटं वरचं गानं
गाजर मुळा नी केळी राताळी माघातला हरभरा
पडवळ काकडी वांगी वालपापडी मक्याचा डुलतोय तुरा
कोथमिर घेवडा सुवासी केवडा उसाचं लावलंय बेनं रं बेनं
गाऊ मोटं वरचं गानं
उसाचं पीक आलंय जोसात औंदा
अरं देईल बरकत मिरची नी कांदा
वाटाना भेंडी तेजीचा सौदा
खुषीत गातुया शेतकरी दादा
गव्हाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करतीया पिरमानं पिरमानं
गाऊ मोटं वरचं गानं
No comments:
Post a Comment