हजारो माणसे अनोळखी चेहऱ्यांची इथे
वेडा मी शोधतो दिसशील का मला तू कुठे
तुझ्याविना हे सारे वैराण रिते रिते
तुझ्याविना हे जिणे आता नकोसे वाटे
जस्ट वन थॉट हॅव ऑन माय माइंड
हॅलो कशी आहेस तू
अल्लड वारा जशी रुणझुणती धून जशी
हॅलो कशी आहेस तू
सळसळत्या रानातल्या फुलाचा गंध जशी
हॅलो कशी आहेस तू
चहूकडे तुझ्या आठवांचे कवडसे
क्षण इथे आपण जगलो ते वेडे पिसे
तुझ्या रंगात साऱ्या रंगून गेलो होतो
मिठीत रेशमाच्या गुंतून गेलो होतो
यु हॅव बीन ऑलवेज ऑन माय माइंड
हॅलो कशी आहेस तू
अल्लड वारा जशी रुणझुणती धून जशी
हॅलो कशी आहेस तू
आता ना वाटे जगावेसे मला
कुठे वाळवंटात शोधू मी तुला
आता ना सोसे दुरावा हा तुझा
नसे अर्थ जगण्यास वाटे ही सजा
इंद्रधनुष्य।परि विरुन गेलीस तू
मोकळे आभाळ हे हातात सोडूनी तू
यु हॅव बीन ऑलवेज ऑन माय माइंड
हॅलो कशी आहेस तू
अल्लड वारा जशी रुणझुणती धून जशी
हॅलो कशी आहेस तू
कशी आहेस तू
सळसळत्या रानातल्या फुलाचा गंध जशी
हॅलो कशी आहेस तू
हॅलो कशी आहेस तू
कशी आहेस तू
हॅलो कशी आहेस तू
कशी आहेस तू
Lyrics -श्रीरंग गोडबोले SHRIRANG GODABOLE
Music -अविनाश विश्वजीत AVINASH VISHVJIT
Movie / Natak / Album -इश्क़ वाला लव ISHQ WALA LOVE
No comments:
Post a comment