रवि गेला रे सोडुनी
निज नीज माझ्या बाळा
बा नीज गडे, नीज गडे लडिवाळा.
रवि गेला रे, सोडुनि आकाशाला
धन जैसें दुर्भाग्याला.
अंधार वसे चोहिंकडे गगनांत
गरिबांच्या जेवीं मनात.
बघ थकुनि कसा निजला हा इहलोक
मम आशा जेवीं अनेक.
खडबड हे उंदिर करिती,
कण शोधायातें फिरती,
परि अंती निराश होती,
लवकरि हेही सोडतील सदनाला
गणगोत जसे आपणांला.
जोंवरतीं या कुडींत राहिल प्राण
तोंवरि तुज संगोपीन.
तद्नंतरची करूं नको तूं चिंता
नारायण तुजला त्राता.
निज नीज माझ्या बाळा
बा नीज गडे, नीज गडे लडिवाळा.
रवि गेला रे, सोडुनि आकाशाला
धन जैसें दुर्भाग्याला.
अंधार वसे चोहिंकडे गगनांत
गरिबांच्या जेवीं मनात.
बघ थकुनि कसा निजला हा इहलोक
मम आशा जेवीं अनेक.
खडबड हे उंदिर करिती,
कण शोधायातें फिरती,
परि अंती निराश होती,
लवकरि हेही सोडतील सदनाला
गणगोत जसे आपणांला.
जोंवरतीं या कुडींत राहिल प्राण
तोंवरि तुज संगोपीन.
तद्नंतरची करूं नको तूं चिंता
नारायण तुजला त्राता.
No comments:
Post a Comment