सांग निळ्या निळवंतीला
तीट रेखिली चंद्रकला
नसे पौर्णिमा तरिही चंद्रमा
ओती अपुल्या सकल कला
हर्षच माझ्या हृदयी राजा
उणे न काही तुला-मला
या कुंजामधी, तुज-माझ्यामधी
स्वर्ग आज रे अवतरला
तू-मी दोन्ही राजा राणी
घर चिमणे नदीकाठाला
घरात माझ्या उषा नि संध्या
सुवर्ण तोरण दाराला
सांग निळ्या निळवंतीला
तीट रेखिली चंद्रकला
आणिक रजनी गाईल गाणी
स्वप्नांची रिझवायाला
तीट रेखिली चंद्रकला
नसे पौर्णिमा तरिही चंद्रमा
ओती अपुल्या सकल कला
हर्षच माझ्या हृदयी राजा
उणे न काही तुला-मला
या कुंजामधी, तुज-माझ्यामधी
स्वर्ग आज रे अवतरला
तू-मी दोन्ही राजा राणी
घर चिमणे नदीकाठाला
घरात माझ्या उषा नि संध्या
सुवर्ण तोरण दाराला
सांग निळ्या निळवंतीला
तीट रेखिली चंद्रकला
आणिक रजनी गाईल गाणी
स्वप्नांची रिझवायाला
No comments:
Post a Comment