साहु कसा वनवास, प्रियतमे ?
क्षणाक्षणाला आठवतो तव, मयुरपंखि सहवास
सांज उतरता क्षितीजावरती
गडद सावल्या मनी दाटती
जीवनज्योती तू मालवता, उरे काजळी रास
फुले पहाता वेलीवरती
तुझेच भावुक डोळे हसती
भावभराने ओठ टेकिता, दंश करी आभास
घरि-दारी वा शयनागारी
रूप घुटमळे नाग केशरी
स्पर्शसुखाची स्वप्ने विरता, जळे एकला श्वास
भासासंगे श्वास मिटावे
जळते ओले दु:ख विझावे
रेघ धुराची तुज भेटाया, भिडु दे आभाळास
क्षणाक्षणाला आठवतो तव, मयुरपंखि सहवास
सांज उतरता क्षितीजावरती
गडद सावल्या मनी दाटती
जीवनज्योती तू मालवता, उरे काजळी रास
फुले पहाता वेलीवरती
तुझेच भावुक डोळे हसती
भावभराने ओठ टेकिता, दंश करी आभास
घरि-दारी वा शयनागारी
रूप घुटमळे नाग केशरी
स्पर्शसुखाची स्वप्ने विरता, जळे एकला श्वास
भासासंगे श्वास मिटावे
जळते ओले दु:ख विझावे
रेघ धुराची तुज भेटाया, भिडु दे आभाळास
No comments:
Post a Comment