हरवले माझे काही तरी,Haravale Majhe Kahi Tari

हरवले माझे काही तरी !
काय हरवले, कसे हरवले, काहि कळे ना परी !

सहज कुणाला दुरुन पाहिले
ओठंगुन मी दूर राहिले
स्पर्शावाचून उगिच उमटला काटा अंगावरी !
हरवले माझे काही तरी !

बघता बघता भुलले डोळे
त्या डोळ्यांतिल भाव निराळे
जागेपणी मज भूल घातली बाई कोणीतरी !
हरवले माझे काही तरी !

लज्जा की ती होती भीती
अजुनी मज ते नसे माहिती
तिथुन परतले, परी विसरले तेथे काहितरी !
हरवले माझे काही तरी !

No comments:

Post a Comment