विठ्ठल तो आला आला,Vitthal To Aala Aala

विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला

तुळशी-माळ घालुनि गळा कधी नाही कुटले टाळ
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ
देव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला

सत्य वाचा माझी होती वाचली न गाथा पोथी
घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती
शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांभूती
विसरून धर्म जाती देई घास भुकेल्याला

No comments:

Post a Comment