विठ्ठल रखुमाई परी -
आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी
कशाला जाऊ मी पंढरपुरी ?
कैलासाहुनी थोर मन हे माझ्या बाबांचे,
शंकराला विष न पचले प्रपंच दु:खाचे,
पचवुन देती अमृत मजला संत वचनांचे
पुंडलिकापरी हात जोडुनी सदैव सामोरी
सात समिंदर भरूनी उरली माया आईची
प्रेमळतेला उपमा नाही वाणी ज्ञानेशाची
मंगल शोभा जिच्या ललाटी कोटी चंद्राची
वत्सलमूर्ति माय माउली मानस - देव्हारी
विटेवरचे जगजेठी हे आले माझ्यासाठी
संसाराचा थाट मांडुनी केली मजला मोठी
करपुष्पांची माला घालुन तुमच्या मी कंठी
चरणांचे हे तीर्थ घेत्ये चंद्रभागेपरी
आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी
कशाला जाऊ मी पंढरपुरी ?
कैलासाहुनी थोर मन हे माझ्या बाबांचे,
शंकराला विष न पचले प्रपंच दु:खाचे,
पचवुन देती अमृत मजला संत वचनांचे
पुंडलिकापरी हात जोडुनी सदैव सामोरी
सात समिंदर भरूनी उरली माया आईची
प्रेमळतेला उपमा नाही वाणी ज्ञानेशाची
मंगल शोभा जिच्या ललाटी कोटी चंद्राची
वत्सलमूर्ति माय माउली मानस - देव्हारी
विटेवरचे जगजेठी हे आले माझ्यासाठी
संसाराचा थाट मांडुनी केली मजला मोठी
करपुष्पांची माला घालुन तुमच्या मी कंठी
चरणांचे हे तीर्थ घेत्ये चंद्रभागेपरी
No comments:
Post a Comment