वीणावती मी तुझी प्रियकरा,Vinavati Mi Tujhi Priyakara

वीणावती मी तुझी प्रियकरा
सप्तसुरांच्या छेडित तारा रात्रंदिन बसले

अमृतकर ते मिळुनी आपुले
नंदनवनिचे रोप लाविले
नवरस गंधे बहरुनी आले
अन्‌ प्रीतीचे अरुण पुष्प हे
हसुनी फुलले, फुलुनि हसले

तुझ्याचसाठी तुझी गायिका
अखंड गाइल भावगीतिका
वाट पाहता राजा रसिका
कितीदा आल्या श्रावण राती
चैत्र चांदणे कितीदा फुलले

No comments:

Post a Comment