वनवास हा सुखाचा,Vanavas Ha Sukhacha

वनवास हा सुखाचा, सुखाचा, सुखाचा
दिनरात लाभताहे सहवास राघवाचा

हाते उभारलेली ही रम्य पर्णशाला
छायेत नांदता या आनंद ये निराळा
भूमीवरी जणू हा संसार पाखरांचा

खांबास चार वेळू, शाकारणी तृणांची
कानी सुरेल वाणी माझ्याच कंकणांची
कष्टे कमावलेला हो आस्वाद अमृताचा

हे सौख्य काय देती साकेत राजधानी ?
प्रीतीरसात न्हाती सुख-दुःख भाव दोन्ही
प्रीती मिळो पतीची हा स्वर्ग स्वामिनीचा

No comments:

Post a Comment