वळणावरुनी वळली गाडी,Valanavaruni Valali Gadi

वळणावरुनी वळली गाडी आज सोडलं गाव
तुझ्याच आई, अश्रूसंगे पुसले पहिले नाव !

नवनावाचं लेवुनी कुंकू जाते माझ्या घरा
वेडी माया झरते नयनी भिजवित सारी धरा !

"सांभाळुन जा, सुखी रहा तू जातिस भरल्या घरा"
बोलातुन या भिजल्या आला धीर तुझ्या पाखरा !

पाखर आई, तव मायेची उदंड लाभो मला
जायाच्या ग, अशाच लेकी तोडुनि ममता लळा

तूच पाहुनी 'ठेव' सुखाची दिलीस माझ्या करी
तेज मुखावर बघशिल येता भेटायाला घरी !

No comments:

Post a Comment