शिका शिका रे शिका,Shika Shika Re Shika

एक दोन तीन चार
शिका शिका रे शिका शिका
वाचा आणिक लिहा चला

काढा गिरवा आकडा एक
जगात आहे देवही एक
देते जन्म जी आपणाला प्रेमळ आई असते एक
नयनी तिचीया देव बघा रे देव बघा
वाचा आणिक लिहा चला

एक एक मिळता होती दोन
आता पाहू या काढतो कोण
हात-पाय-डोळे-कान किती किती बघा मोजुनी दोन
एकच आपुल्या या देहा रे या देहा
वाचा आणिक लिहा चला

दोना नंतर तीन, वाचा एक-दोन-तीन
दत्त दिगंबर तीन मुखाचा
तीनच पाने त्या पळसाला कोकण झाला जरी देशाचा
मुळात माणूस एक असा रे एक असा
वाचा आणिक लिहा चला

आता राहिला आपुला चार
घरास अपुल्या भिंती चार
पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर
निळ्या नभाचे छप्पर सुंदर याच दिशांच्या चौकानावर
घर करता देव बाप्पा रे देव बाप्पा

No comments:

Post a Comment