सप्तस्वरांनो लय,Sapt Swarano Lay

सप्तस्वरांनो, लयशब्दांनो, जगेन तुमच्यासाठी
तुमच्यासाठी मरेनही मी, जगेन तुमच्यासाठी

तुम्हीच माझे मायतात हो तुम्हीच माझे गुरू
अनंत हस्ते अखंड दाते समूर्त कल्पतरू
तुम्हीच माझे सात सूर्य अन्‌ तुम्हीच माझी धरती

प्रकाशदायी सूर्य तुम्ही अन्‌ तुम्ही बरसते मेघ
तुम्हीच माझ्यामधे पेरिली नवसृजनाची रेघ
तुमच्या स्पर्षे होते काया वीज जणू लवलवती

तुमच्या संगे भान हरपता कण कण डोलू लागे
एक अनोखा गोफ विणाया आतूर जीवितधागे
देहामधले अणुरेणूही पैंजण होऊन गाती

No comments:

Post a Comment