सनई वाजे मंजूळ नादे,Sanai Vaje Manjul Nade

सनई वाजे, मंजूळ नादे, चौघड झडला समयाला
दोन मनांचे होते मीलन लग्न म्हणती या विधीला

वात्सल्याची ममता वेडी, जीव जगवितो जीवाला
शुभ मुहूर्तावर शुभमंगल हे वासरू तोडिती गाईला

धन्य आपुली माता-पिता हो जयांनी अपणां जन्म दिला
सार्थक व्हावे, असेची करावे मिळवू आपण कीर्तीला

तुम्हांसाठी सर्वच झटतील सर्वांसाठी तुम्ही झटला
एकदिलाने नांदेल अपुल्या सुख-समृद्धी देशाला

No comments:

Post a Comment