सखि मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?
मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशील का ?
हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा सूर तू होशील का ?
जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले
तरिही उरे काही उणे, तू पूर्तता होशील का ?
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी पण सांग तू येशील का ?
मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशील का ?
हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा सूर तू होशील का ?
जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले
तरिही उरे काही उणे, तू पूर्तता होशील का ?
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी पण सांग तू येशील का ?
No comments:
Post a Comment