सखी ग मुरली मोहन,Sakhi Ga Murali Mohan

सखी ग, मुरली मोहन मोही मना
गाऊ किती पुन्हा पुन्हा, त्याच्या गुणा

शृंगाराची प्रीत करिता चिंतन
अनुराग त्याचा देता आलिंगन
चंदनाचा गंध येत पंचप्राणा

कानी येता ज्याच्या बासुरीचे सूर
कालिंदीला येता आनंदाचा पूर
गोपिकांच्या घरी प्रीतीचा पाहुणा

No comments:

Post a Comment