आतड्याची माया माझी तुझ्याविण पोरकी
लेक माझी लाडकी तू लेक माझी लाडकी
झोपडीत बाळी माझी दळिंदर ल्याली
काळजाच्या नरोटीनं अमृत प्याली
'आई' म्हणायाच्या आधी केली तुला पारखी
लेक माझी लाडकी तू लेक माझी लाडकी
नावरूप आलं तुला पीळ माझा सुटला
उदो उदो बघुनिया पांग सारा फिटला
किती तुझा थोरपणा काय माझी लायकी
लेक माझी लाडकी तू लेक माझी लाडकी
एकदाच 'आई' असा बोल कानी यावा
तुझ्या मांडीवर पोरी जीव माझा जावा
शेवटच्या हुंदक्याला जिणं लागे सार्थकी
लेक माझी लाडकी तू लेक माझी लाडकी
लेक माझी लाडकी तू लेक माझी लाडकी
झोपडीत बाळी माझी दळिंदर ल्याली
काळजाच्या नरोटीनं अमृत प्याली
'आई' म्हणायाच्या आधी केली तुला पारखी
लेक माझी लाडकी तू लेक माझी लाडकी
नावरूप आलं तुला पीळ माझा सुटला
उदो उदो बघुनिया पांग सारा फिटला
किती तुझा थोरपणा काय माझी लायकी
लेक माझी लाडकी तू लेक माझी लाडकी
एकदाच 'आई' असा बोल कानी यावा
तुझ्या मांडीवर पोरी जीव माझा जावा
शेवटच्या हुंदक्याला जिणं लागे सार्थकी
लेक माझी लाडकी तू लेक माझी लाडकी
No comments:
Post a Comment