लेक लाडकी या घरची,Lek Ladaki Ya Gharachi

लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची

सौख्यात वाढलेली
प्रेमात नाहलेली
कळिकळि फुलून ही चढते
मंडपी वेल मायेची

संपताच भातुकली
चिमुकली ती बाहुली
आली वयात खुदुखुदू हसते
होऊनी नवरी लग्नाची

हे माहेर, सासर ते
ही काशी, रामेश्वर ते
उजळिते कळस दो घरचे
चंद्रिका पूर्ण चंद्राची

No comments:

Post a Comment