लाजले मी लाजले,Lajale Mi Lajale

आज माझ्या साजणाने गुपीत माझे जाणिले
लाजले मी लाजले

राग धरुनी अंतरी मी, रुसुन बसले बावरी मी
मूक होते ओठ तरीही, दोन डोळे बोलले

बिलगली वृक्षास वेली, बहरली गाली अबोली
मीलनाचे चित्र त्यांचे, स्वप्नरंगी रेखीले

No comments:

Post a Comment