लाज राख नंदलाला,Laj Rakh Nandalala

तव भगिनीचा धावा ऐकुनि
धाव घेइ गोपाळा
लाज राख नंदलाला

द्युतामध्ये पांडव हरले
उपहसाने कौरव हसले
लाज सोडुनी सभेत धरिले
माझ्या पदराला

अबलेसम हे पांडव सगळे
खाली माना घालुनि बसले
आणि रक्षाया शील सतीचे
कुणी नाही उरला

आसु माझिया नयनी थिजले
घाबरले मी, डोळे मिटले
रूप पाहता तुझे सावळे
प्राण आता उरला

No comments:

Post a Comment