रात्री स्वप्‍न मला पडले,Ratri Swapna Mala Padale

रात्री स्वप्‍न मला पडले !

सज्ज मंडपी सनई वाजे
मनातल्या मी मनात लाजे
चालत होते त्यांच्या मागुन
सप्तपदीची सात पाऊले

अंतरपाट तो दोघा मधला
गुपित मनिचे हळुसा वदला
सौख्यभराने जगात नांदा
प्रेमळ माता-पिता बोलले

वधु-वरांची वरात सजली
नगरामधुनी वाजत फिरली
उंबरठ्यावरी माप सांडुनी
घरामध्ये मी त्यांच्या आले

No comments:

Post a Comment