यश तेची विष झाले,Yash Techi Vish Jhale

यश तेची विष झाले, देहात ते उफाळे
स्फुंदून काय आता, जावे मिटून डोळे ?

सुमहार वाटला जो, तो एक साप काळा
प्रासाद वाटला जो, ती बंद बंदिशाळा
या बंधनात बांधी माझे मलाच जाळे

हा खेळ संपलासे, आता न हारजीत
या हुंदक्यात गेले कोंडून प्रेमगीत
माझ्याच काजळाने हे तोंड होय काळे !

No comments:

Post a Comment