यमुनाकाठी ताजमहाल,Yamunakathi Taj Mahal

बादशहाच्या अमर प्रीतिचे
मंदिर एक विशाल
यमुनाकाठी ताजमहाल

मूर्तिमंत झोपली प्रीत अन्‌
मृत्यूचे ओढून पांघरुण
जीवन कसले महाकाव्य ते
गाईल जग चिरकाल

नि:शब्द शांती अवतीभवती
हिरे जडविले थडग्यावरती
एकच पणती पावित्र्याची
जळते येथ खुशाल

हळूच या रसिकांनो येथे
नका वाजवू पाऊलाते
दिव्य दृष्टिला होईल तुमच्या
मंगल साक्षात्कारNo comments:

Post a Comment