रघुपति राघव गजरी गजरी,Raghupati Raghav Gajari

रघुपति राघव गजरी गजरी
तोडित बोरे शबरी

ध्यानी जपली मनी पूजिली
रघुनाथाची मूर्त सावळी
बघावयाला याच डोळी
आतुरलेली किती अंतरी

रामनाम ते वदता वाचे
अमृत लाघव अधरी नाचे
हाती येता फळ भक्तीचे
चाखित होती नाम माधुरी

भजनी रमुनी भिल्लिण शामा
म्हणते लवकर ये रे रामा
आलिंगुनीया भक्ति प्रेमा
स्वर्ग बघू दे मला भूवरीNo comments:

Post a Comment