रघुपती आपल्या पदस्पर्शाने,Raghupati Aapulya

रघुपती आपल्या पदस्पर्शाने
पावन मज केले

अनेक शतकांचे धुलीकण
बसले होते अंग लपेटून
पाषाणाचे कठोर दु:सह
जीवन मी जगले

देवेंद्राने मला फसविले
अजाणता मी पापी ठरले
पतिच्या निष्ठूर शापवाणिने
हाय बळी पडले

दिनरात्रीचे मोजित क्षण क्षण
वाट पाहिली व्याकुळ होऊन
करुणाघन तू या अबलेला
संजीवन दिधले