रघुनंदन आले आले,Raghunandan Aale Aale

रघुनंदन आले आले, धरणी माता कानी बोले

शिरीष कुसुमाहुनीही कोमल, कोमेजुन ही काया जाईल
सप्तस्वर्ग तो लवुनी खाली, धरुनि चालला छ्त्र साउली
रविचा रथ हळुहळु चाले

वृक्षलतांनो हृदय फुलांच्या, चरणाखाली रघुरायाच्या
पायघड्या या लवकर घाला, माझ्यासाठी सांगा त्याला
शिळा अहिल्या हो झाले

पाउलातली धूळ होऊनी, बसली होती ती संजीवनी
भाळी लावता होइन पावन, आणिक रामा तुझेच दर्शन
धन्य मी पतिता झाले

No comments:

Post a Comment