मुलुख त्यात मावळी,Mulukha Tyat Mavali

धीरे जरा गाडीवाना, रात निळी काजळी
मुलुख त्यात मावळी, मुलुख त्यात मावळी !

वाट चुके लावणाची, वळणाचा पेच पडे
डोंगराच्या डगरींना, घाटांचा माठ जडे
दोन्ही बाजू दाट, कुठे आंबराई जांभळी
मुलुख त्यात मावळी !

घुंगुराच्या तालावर, सैल सुटे कासरा
खडकाशी चाक थटे, बैल बुजे बावरा
पेंगुळता हादरती गाडीमंदी मंडळी
मुलुख त्यात मावळी !

करवंदी जाळिमंदी, ओरडती रातकिडे
निवडंगी नागफणी, आडविता चाल अडे
ठोकरली येथ गड्या, बादशाही आंधळी
मुलुख त्यात मावळी !

No comments:

Post a Comment