मुली तू आलीस अपुल्या,Muli Tu Aalis Apulya

लिंबलोण उतरता अशी का, झालीस ग बावरी
मुली तू, आलीस अपुल्या घरी

हळदीचे तव पाउल पडता
घरची लक्ष्मी हरखुन आता
सोन्याहुनी ग झाली पिवळी
मांडवाला कवळुन चढली, चैत्रवेल ही वरी

भयशंकित का अजुनी डोळे ?
नको लाजवू सारे कळले
लेकीची मी आहे आई
सासुरवाशिण होऊन मीही, आले याच घरी

याच घरावरी छाया धरुनी
लोभ दाविती माय पक्षिणी
हसते घर हे तुझ्या दर्शनी
सुखव मलाही आई म्हणुनी, बिलगुनि माझ्या उरीNo comments:

Post a Comment