मुशाफिरा ही दुनिया सारी, घडीभराची वस्ती रे
नसे महाली ख्याली खुशाली, ती तर रस्तोरस्ती रे
लावू नको रे हात कपाळी, तुझी रिकामी राहील झोळी
सुखदुःखाशी हसून खेळून, मुशाफिरा कर दोस्ती रे
रोख आजला, उद्या उधारी, ऐसी भैया दुनियादारी
कधी गिरस्ती कधी फिरस्ती, झूट धनाची मस्ती रे
आज अमिरी, उद्या फकिरी, कुठेही भैया टाक पथारी
आलास नंगा, जाशील नंगा, तुझी खुदाला धास्ती रे

No comments:
Post a Comment