मुक्या मनाचे बोल,Mukya Manache Bol

मुक्या मनाचे बोल सजणा; बोल झाले फोल

चंदेरी दर्यात वितळल्या सोनेरी तारा
पानांच्या कानांत कुजबुजे हलके हलके वारा
सुनासुना किति शांत शांत अन्‌ होता सर्व किनारा
पिकल्या फळांत चोच खुपसूनी तोच उडुन जाय चंडोल

हृदयाच्या अंधारात नाव तुझे मी आठवते
दो नयनांच्या ऐन्यात चित्र तुझे मी साठवते
नि:श्वासाच्या कवनांत पत्र तुला मी पाठवते
सखया, तुझ्याविना भरेचना, जखम उरातील खोल



No comments:

Post a Comment