मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी
ओठात घोळविन रामप्रीतिची गाणी
पुसतील कुशल मज लता, कर्दली, केळी
मोगरा, मालती फुलतिल भलत्या वेळी
देईल साद मज दुरुनि श्यामाराणी
देतील ओंजळी भरून जांभळी, बोरी
येतील पाडसे दबत हळू शेजारी
चुंबीन त्यास मी भरविन चारापाणी
पाहीन दुरुन मी यज्ञधुमाची रेखा
जाईन तपोवनि अवचित कोण्या एका
तरुतळी बसुनिया ऐकिन मुनीची वाणी
ओठात घोळविन रामप्रीतिची गाणी
पुसतील कुशल मज लता, कर्दली, केळी
मोगरा, मालती फुलतिल भलत्या वेळी
देईल साद मज दुरुनि श्यामाराणी
देतील ओंजळी भरून जांभळी, बोरी
येतील पाडसे दबत हळू शेजारी
चुंबीन त्यास मी भरविन चारापाणी
पाहीन दुरुन मी यज्ञधुमाची रेखा
जाईन तपोवनि अवचित कोण्या एका
तरुतळी बसुनिया ऐकिन मुनीची वाणी
ह्या गाण्याच्या शब्दांवरून असे वाटते कि सीतामाईला पुन्हा वनवासात जावे लागणार हे कळल्यावर सीतामाई काहीशा नाराजीनेच आपले भाव व्यक्त करतं आहे.आपले काय मत आहे?
ReplyDeleteकदाचित आपल्या नशीबी आलेले काहीशा सकारात्मकतेने स्वीकार करायचा प्रयत्न असावा. तुमची टिप्पणी वाचून थोड्या लपलेल्या नाराजीचा भास मलाही झाला.
ReplyDeleteसीतामाईला वनवासात पाठवण्याचे ठरले तेव्हा तिला 'आपले डोहाळे पुरवायचे आहेत' असे वाटले होते. कारण तसे डोहाळे लागल्याचे तिने रामरायाला सांगितले होते. (डोहाळे पुरवा रघुतिलका तुम्ही माझे)- गीतरामायण
ReplyDeleteम्हणून ती स्वप्ने रंगवीत आहे. अगदी करूण प्रसंग.
Barobar. Laxman tila rathamadhe basavun aranyat Gheun gela hota .
ReplyDelete