मी पुन्हा वनांतरी फिरेन,Mi Punha Vanantari Phiren

मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी
ओठात घोळविन रामप्रीतिची गाणी

पुसतील कुशल मज लता, कर्दली, केळी
मोगरा, मालती फुलतिल भलत्या वेळी
देईल साद मज दुरुनि श्यामाराणी

देतील ओंजळी भरून जांभळी, बोरी
येतील पाडसे दबत हळू शेजारी
चुंबीन त्यास मी भरविन चारापाणी

पाहीन दुरुन मी यज्ञधुमाची रेखा
जाईन तपोवनि अवचित कोण्या एका
तरुतळी बसुनिया ऐकिन मुनीची वाणी2 comments:

  1. ह्या गाण्याच्या शब्दांवरून असे वाटते कि सीतामाईला पुन्हा वनवासात जावे लागणार हे कळल्यावर सीतामाई काहीशा नाराजीनेच आपले भाव व्यक्त करतं आहे.आपले काय मत आहे?

    ReplyDelete
  2. कदाचित आपल्या नशीबी आलेले काहीशा सकारात्मकतेने स्वीकार करायचा प्रयत्न असावा. तुमची टिप्पणी वाचून थोड्या लपलेल्या नाराजीचा भास मलाही झाला.

    ReplyDelete