मी पतंग तू दोरा
तू तुषार मी जलधारा
तुझे शिल्प हे घडविताना
असेल प्रभूची छान कल्पना
तुझ्या रूपाचा अनुपम नमुना
वेड लावी भ्रमरा
मी पतंग तू दोरा
स्पर्श तुझा तो होता अवचित
सर्वांगाला करी रोमांचित
प्रेम आपुले करितो पुलकित
लाजरा शहारा
तू पतंग मी दोरा
मौनातून हुंकार उमटला
स्वप्नातून आकार उमलला
मीलनात मज अर्थ उमजला
प्रीत येई बहरा
तू पतंग मी दोरा
तू तुषार मी जलधारा
तुझे शिल्प हे घडविताना
असेल प्रभूची छान कल्पना
तुझ्या रूपाचा अनुपम नमुना
वेड लावी भ्रमरा
मी पतंग तू दोरा
स्पर्श तुझा तो होता अवचित
सर्वांगाला करी रोमांचित
प्रेम आपुले करितो पुलकित
लाजरा शहारा
तू पतंग मी दोरा
मौनातून हुंकार उमटला
स्वप्नातून आकार उमलला
मीलनात मज अर्थ उमजला
प्रीत येई बहरा
तू पतंग मी दोरा
No comments:
Post a Comment