मी निरांजनातील वात,Mi Niranjanatil Vaat

मी निरांजनातील वात
माझ्या देवापाशी जळते
हासत देवघरात

माझ्या प्रभूस माझी पारख
माझ्या देवाचे मज कौतुक
प्रभा प्रभूच्या सहवासाची,
फुलली या हृदयात

प्रशांत नीरव या एकांती
शुचिर्भूतता सारी भवती
पवित्र दर्शन सदा लोचना
लाभतसे दिन रात

कणाकणातून प्रभा उधळिता
पटे जिण्याची मज सार्थकता
उषा फुलविता भयाण रात्री
भासे रवि तेजात

आस एकली अंत:करणी
वास मिळावा नित तव चरणी
नको मना या अन्य विलोभन
गुंताया मोहात

तुमची करण्यासाठी सेवा
प्राणाहुती ही माझी देवा
प्रकाशपूजन माझे घ्या हो,
जे प्राणा प्राणांत

No comments:

Post a Comment