मनीमाऊचं बाळ कसं,Mani Maucha Bal Kasa

छान छान छान
मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान

इवलीशी जिवणी नि इवलेसे दात
चुटुचुटु खाती कसा दूध आणि भात
इवले इवले डोळे, इवले इवले कान

इवल्याशा पायामध्ये इवलासा चेंडू
फेकिता मी घ्याया धावे दुडु दुडु दुडू
इवल्याशा शेपटीची झाली कमान

आली आली मनीमाऊ दूर जरा जाऊ
बाळाचि मज्जा सारी दुरुनिया पाहू
आईशी बाळ खेळे विसरुनी भानNo comments:

Post a Comment