मनोरथा चल त्या,Manoratha Chal Tya

मनोरथा, चल त्या नगरीला
भूलोकीच्या अमरावतिला

स्वप्नमार्ग हा नटे फुलांनी
सडे शिंपीले चंद्रकरांनी
शीतल वारा सारथि हो‍उनि
अयोध्येच्या नेई दिशेला

सर्व सुखाचा मेघ सावळा
रघुनंदन मी पाहिन डोळा
दोन करांची करुन मेखला
वाहिन माझ्या देवाला

No comments:

Post a Comment