मनी वसे जे स्वप्नी दिसे,Mani Vase Je Swapni Dise

मनी वसे जे स्वप्नी दिसे
ते अवचित बाई असे गवसले कसे ?

नील नभाच्या घुमटाखाली
रात चांदणी दिवसा फुलली
पानोपानी त्याच तरुतळी तेच तेच कवडसे

पुष्पकरांचा विळखा घालुनी
जीव जिवाला बसे बिलगुनी
शहारुनी त्या गोड अठवणी मनात मनही हसेNo comments:

Post a Comment