मानसकन्या कण्वमुनींची,Manas Kanya

मानसकन्या कण्वमुनींची
बसुनि वनी एकांती
गुंफिते माळ बकुळफुलांची

शारद नयनी उमलत होता
अनुरागाचा रम्य नीलिमा
अरुण कपोली गोड लालिमा,
फुलवित लाज तियेची

यौवन सौरभ पुसतो तिजला
कोण यायचा सखे पाहुणा ?
नावाविणही घेत उखाणा,
प्रीत तिच्या हृदयाची

आठवणींची करिता मृगया
हसते खुदुखुदु मनी आतुरता
सखया येता; मंगल घटिका,
आली स्वयंवराची

No comments:

Post a Comment