मला इष्काचि इंगळी डसली,Mala Ishkachi Ingali Dasali

मी एकलीच निजले, रातीच्या अंधारात
नको तिथंच पडला, अवचित माझा हात
हाताखालती नांगा काढुन, वैरिण ती बसली
ग बाई मला, इष्काचि इंगळी डसली
बाई ग, बाई ग

मारलि किंकाळी कळ ल‍इ आली
उरि घामानं भिजली चोळी
अंगाअंगाची काहिली झाली
सांगा ही कळ कसली

साऱ्या घरात फिरले बाई ग
मला औशिद गावलं न्हाई ग
तंवर कुणाची चाहूल आली
खूण खुणेला पटली

ह्या इंगळीचा कळला इंगा
खुळ्यावानि मी घातला पिंगा
मंतर घाला हलका हलका
नार चुकुन फसलीNo comments:

Post a Comment