मला न कळते सारेगम,Mala Na Kalate

मला न कळते सारेगम- गाण्याचे संगीत
मी गातो बडबड गीत
बड बड बड बड गीत

जमवून सारी वेडी पोरं, टप टप पाडून कैऱ्या-बोरं
खुशाल बसतो फांदीवरती नाही कुणाला भीत

ओढा गाई झुळझुळ गाणी, कोकिळ गाई अमृतवाणी
आम्ही गातो त्यांच्यासंगे तीही होती धीट

कधी पाखरे होऊन फिरतो, कधी आईच्या कुशीत शिरतो
बाळपणीचा काळ सुखाचा हीच आमुची रीत

No comments:

Post a Comment