माझ्या शेतात सोनंच,Majhya Shetat Sonach

माझ्या शेतात सोनंच पिकतंय
पानापानात लखलख करतंय

साता समिंदराचं माणिक मोती
देवाच्या हातानं आलं रे खालती
झेललं रे झेललं वरच्या वरती
पिकाच्या डोईवर कणसात भरतंय

कावळ्याच्या डोळ्यांगत पाटाचं पाणी
रावाची रंगली मोटंवर लावणी
पांढरिची लक्ष्मी पाजतीया पाणी
मळ्याच्या उरात खळखळ करतंय

No comments:

Post a Comment