मज नकोत अश्रू घाम,Maj Nakot Ashru Gham

मज नकोत अश्रू घाम हवा
हा नव्या युगाचा मंत्र नवा !

होते तैसी अजून उते मी
सधन अन्नदा सुवर्णभुमी
खंडतुल्य या माझ्या धामी
का बुभुक्षितांचा रडे थवा ?

अपार लक्ष्मी माझ्या पोटी
का फिरसी मग माझ्या पाठी
एक मूठभर अन्नासाठी,
जगतोस तरी का भ्याड जीवा ?

काय लाविसी हात कपाळी
फेकून दे ती दुबळी झोळी
जाळ आळसाची तव होळी
तू जिंक बळाने पराभवा !

मोल श्रमाचे तुला कळू दे
हात मळू दे, घाम गळू दे
सुखासिनता पूर्ण जळू दे
दैन्यास तुझ्या हा एक दवा !

No comments:

Post a Comment