मज भेटूनी जा हो,Maj Bhetun Ja Ho

मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता

का तुम्ही कमंडलु विसरून आला इथे
प्रिय श्वान आज ते तुम्हासवे का नसे
काखेची झोळी ती विसरून गेला कुठे
परी तुम्हास पुरते ओळखिले मी आता
मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता

किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले
ह्रदयीचे भावही व्यथितपणे कळविले
इंद्रीयास दमुनी चित्ताला वळविले
का उगाच असली सत्वपरिक्षा घेता
मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता

किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला
नामी योग तुमचा कधी घडावा मला
सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला
मन रंगुनी गेले गुरुराया ये आता
मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता

No comments:

Post a Comment