जोड झणिं कार्मुका
सोड रे सायका
मार ही ताटिका, रामचंद्रा !
दुष्ट मायाविनी
शापिता यक्षिणी
वर्तनीं दर्शनीं, ही अभद्रा
तप्त आरक्त हीं पाहतां लोचनें
करपल्या वल्लरी, करपलीं काननें
अतुलबलगर्विता
मूर्त ही क्रूरता
ये घृणा पाहतां, क्रूर मुद्रा
ऐंक तें हास्य तूं, दंत, दाढा पहा
मरुन हसती जणूं, भरुन गेली गुहा
मृत्यु-छाया जशी
येतसे ही तशी
ओढ दोरी कशी, मोड तंद्रा
थबकसी कां असा ? हाण रे बाण तो
तूंच मृत्यू हिचा, मी मनीं जाणतो
जो जनां सुखवितो
नारीवध क्षम्य तो
धर्म तुज सांगतो, मानवेंद्रा !
दैत्यकन्या पुरा, ग्रासुं पाहे धरा
देव देवेंद्रही, मारि तें मंथरा
विष्णू धर्मोदधी
शुक्रमाता वधी
स्त्री जरी पारधी, अरि मृगेंद्र
धांवली लाव घे, कोप अति पावली
धाड नरकीं तिला, चालल्या पावलीं
बघती तव विक्रमां
देव पुरुषोत्तमा
होऊं दे पौर्णिमा, शौर्यचंद्रा
सोड रे सायका
मार ही ताटिका, रामचंद्रा !
दुष्ट मायाविनी
शापिता यक्षिणी
वर्तनीं दर्शनीं, ही अभद्रा
तप्त आरक्त हीं पाहतां लोचनें
करपल्या वल्लरी, करपलीं काननें
अतुलबलगर्विता
मूर्त ही क्रूरता
ये घृणा पाहतां, क्रूर मुद्रा
ऐंक तें हास्य तूं, दंत, दाढा पहा
मरुन हसती जणूं, भरुन गेली गुहा
मृत्यु-छाया जशी
येतसे ही तशी
ओढ दोरी कशी, मोड तंद्रा
थबकसी कां असा ? हाण रे बाण तो
तूंच मृत्यू हिचा, मी मनीं जाणतो
जो जनां सुखवितो
नारीवध क्षम्य तो
धर्म तुज सांगतो, मानवेंद्रा !
दैत्यकन्या पुरा, ग्रासुं पाहे धरा
देव देवेंद्रही, मारि तें मंथरा
विष्णू धर्मोदधी
शुक्रमाता वधी
स्त्री जरी पारधी, अरि मृगेंद्र
धांवली लाव घे, कोप अति पावली
धाड नरकीं तिला, चालल्या पावलीं
बघती तव विक्रमां
देव पुरुषोत्तमा
होऊं दे पौर्णिमा, शौर्यचंद्रा
No comments:
Post a Comment