मारू बेडूक उडी गड्यांनो,Maru Beduk Udi Gadyano

मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी
लपाछपी खेळता देउ या झाडामागे दडी !

सुट्टी लागली सरली शाळा
कोण पहाटे उठतो खुळा !
"अभ्यासाला बसा !", कुणी ना ओरडती घडिघडी !

गावाबाहेर वाहे नदी
झाडे बघती पाण्यामधी
सळसळणाऱ्या लाटांमध्ये घेइल कोणी बुडी !

कुणी पाडतिल चिंचा बोरे
"एक आकडा मलाहि दे रे ?"
झाडाखाली कुणी बापडा लाविल लाडीगोडी !

No comments:

Post a Comment